महाराष्ट्र
काँग्रेसचे नेते, उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्याकडून मिरज विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी अन् शुभेच्छा
मिरज : काँग्रेसचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी मिरज विधानसभा क्षेत्रामधील गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक गावातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकांनी समाधान व्यक्त केले.
मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळा भेटी देऊन या सांस्कृतिक आणि धार्मिक कामांमध्ये उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी सहभाग दर्शविला.यावेळी लोकांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी गणेश भक्त कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून गणेशोत्सव मंडळास शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.