महाराष्ट्र

नवोदयच्या विद्यार्थ्यांना गुड टच बॅटच्या बाबतीत जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी केले प्रबोधन

जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्या हस्ते झाले प्रदर्शनाचे उदघाटन

 

 

पलूस: पलूस (जि.सांगली) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅट टच बाबतीत सांगली जिल्ह्याचे माहिती अधिकारी फारुख बागवान यांनी प्रबोधन केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे, योगेंद्र देवरस, महेश निकम,नमिता आचार्य, शंभू भाई कांजिया इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयात शिक्षा मे कला या विषयावरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा चे माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या जुन्या काळातील वापरण्यात येत असलेल्या पारंपारिक वस्तू कलाकृती यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या कलेचे कौतुक बागवान यांनी केले. यावेळी बोलताना फारुख भगवान म्हणाले सध्या समाजामध्ये वातावरण कडून झाले आहे तरी यापासून आपल्या स्वतःचे संरक्षण करण्याकरिता गुड टच आणि बॅट टच याबाबतची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे गैरप्रकार घडत असतील तर तात्काळ संबंधित शिक्षकांना प्राचार्यांना याची माहिती द्यावी असेही आव्हान केले
यावेळी बोलताना अख्तर पिरजादे म्हणाले,
नवोदय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूप चांगली आहे इथे आल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून प्रसन्न वाटते.
प्राचार्य अनिल कांबळे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाची माहिती कथन केली,
स्वागत प्रदर्शनाचे समन्वयक योगेंद्र देवरस यांनी केले.आभार महेश निकम यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!