रयत शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज रामानंदनगरच्या विद्यार्थ्यांची “रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प क्षेत्र भेट अंतर्गत दुधोंडी येथील जे के बापू जाधव यांच्या डी हायड्रेशन प्रोजेक्ट ला भेट
मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संपूर्ण कृष्णाकाठ उद्योग समूहाची दिली माहिती

दुधोंडी ; रयत शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज रामानंदनगर येथील ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी “रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प क्षेत्र भेट अंतर्गत” कृष्णाकाठ उद्योग समुहाचे संस्थापक तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. जे के (बापू) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रिया व साठवणूक सह संस्था मर्या. दूधोंडीच्या (डी हायड्रेशन) प्रोजेक्ट ला भेट दिली, यावेळी उद्धव आरबूने यांनी डी हायड्रेशन प्रोजेक्ट ची स्थापने पासून ते आजपर्यंत प्रवासाची तसेच होणाऱ्या पालेभाज्यावर प्रक्रियाची तसेच तेथील मार्केट, नफा तोटा, प्रकल्पाचा उद्देश, इतर सर्व लागणाऱ्या गोष्टींची माहिती देण्यात आली, माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची व शकांची उत्तरे देण्यात आली, यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व संपूर्ण कृष्णाकाठ उद्योग समूहाची माहिती दिली, यावेळी कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रिया व साठवणूक सह. संस्थेचे चेअरमन जोतिराम (आप्पा) साळुंखे, मॅनेजर दिगंबर जाधव अक्षय कदम व शाळेचे सौ. पाटील सी ऐस, सौ. आटूगडे एच ऐस, श्री. दीक्षित आर ए, श्री. तांडावार एच एस, श्री. वालदे बी एस, श्री सूर्यवंशी बी एस, श्री. सावंत ए एन, श्री. पडळकर जी ए, सौ. पाटील एस व्ही, सौ. मुळे ए एस, कु. पाटील ए आर, सौ लाड के एस, सौ. तोडकर ए जे, श्री. साळुंखे एम डी व इतर प्राध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संखेने उपथित होते.*