आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

केंद्रीय संचार ब्युरो आणि पायोनियर हायस्कूल, अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर येथे विशेष प्रसिद्धी अभियान संपन

मुंबई, 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार आणि  पायोनियर हायस्कूल, अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने पायोनियर हायस्कूल येथे झेंडावंदन आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काल वरील दोन्ही शाळांमध्ये घेण्यात आलेल्या निबंध तसेच चित्रकला स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली. यावेळी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी विविध मैदानी खेळांचे तसेच त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात, भारताच्या विकासाला आकार देणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने भविष्यकालीन उद्दिष्टांची मालिका रेखाटली.

 

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता आवळे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय संचार ब्यूरोद्वारे कोल्हापूर मधील कसबा बावडा येथे 14 आणि 15 ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले असून नागरिकांचा त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!