राजकीय

बंदोबस्त वाढवा, पोलिस तैनात करा ; नागरिकांना आधार द्या : माजी सहकार मंत्री तथा आमदार:डॉ विश्वजीत कदम

भिलवडी येथे वाढत्या चोरीच्या संदर्भात नागरिकांशी संवाद : पोलिस अधीक्षक संदीप घुगे, तहसीलदार दीप्ती रिठे, प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

 

fi

 

 

 

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने बंदोबस्त वाढवला पाहिजे, अनेक लोक वस्तीमध्ये पोलिस तैनात करण्यात यावेत. नागरिकांना आधार द्यावा , असे आवाहन माजी सहकार मंत्री तथा आमदार:डॉ विश्वजीत कदम यांनी केले ते भिलवडी येथे वाढत्या चोरीच्या संदर्भात  प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.

यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, तहसीलदार दीप्ती रिठे, प्रांत अधिकारी,  गटविकास अधिकारी अरविंद माने , भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड आणि विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होते. 

माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत यांनी सांगितले की, पलूस तालुक्यात वाढलेल्या चोरी व दरोड्याच्या घटना हा गंभीर विषय आहे . वाढती गुन्हेगारी ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. या समस्येला तोंड देत असताना पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र नागरिकांनी देखील नेहमी सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः महिला भगिनींना चोरी/दरोडा घालणारी टोळकी टार्गेट करीत आहे . याकरिता सर्व लोकांनी खबरदारी आणि सतर्कता राहणं आवश्यक आहे. गावातील नागरिकांनी, युवकांनी गस्ती वाढवली पाहिजे, कोणतेही घटनेला घाबरू नका मी तुमच्या सदैव पाठीशी असेल, असेही आमदार  डॉ ‌ विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितले.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले की, भिलवडी आणि परिसरात चोरी होणे ही गंभीर बाबा असून घाबरून जाऊ नका,  पोलीस मोठ्या प्रमाणात आपल्याला संरक्षण देईल. संध्याकाळी सहा नंतर आपली ओळखपत्र आपल्या ताब्यात ठेवा, पोलिसांनी ओळख सांगितल्यानंतर ओळख पटवून द्या एखांदा अनोळखी व्यक्ती आढळल्यास लगेच पोलिसांना ही माहिती द्या असे आव्हान घुगे यांनी केले.

या बैठकीच्या वेळी भिलवडी आणि भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दतील सरपंच,  उपसरपंच , विविध क्षेत्रातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!