क्रीडामहाराष्ट्र
भिलवडी गावचे हर हुन्नर, धडाडीचे क्रिकेटपटू दीपक पाटील यांची सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या ट्रस्टी पदी निवड

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविणारे, हर हुन्नर, धडाडीचे क्रिकेटपटू दीपक पाटील यांची सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या ट्रस्टी पदी निवड झाली.
भिलवडी गावांमध्ये एक नवा संकल्प आणणारे , भिलवडी गावात भव्य अशा किरकेट स्पर्धा भरवणारे, सर्वसामान्याशी नाळ जोडणारे, माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे निकटवर्तीय सहकारी दीपक पाटील यांची सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या ट्रस्टी पदी निवड झाली. ही बाब भिलवडीकरांच्या अभिमानास्पदाची आहे. या निवडीबद्दल सांगली जिल्ह्यासह, भिलवडी आणि परिसरातून दीपक पाटील यांच्यावर शुभेच्छाचा वर्षा व अभिनंदन होत आहे.