क्राईममहाराष्ट्र
राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथे कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी
कोल्हापूरः अनिल पाटील
वैरण कापूण घरी येत असतानां कूत्र्याने पाटीमागून येवून हल्ला केल्याने महीला जखमी झाली. लताबाई रघूनाथ पाटील वय 40 रा. चंद्रे ता.राधानगरी असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सूमारास घङली.
लताबाई पाटील या सकाळी आपल्या पती बरोबर जणावारानां वैरण आणण्यासाठी शेताकङे गेल्या होत्या. वैरण कापून घरी येत आसतानां मातंग वसाहतीमध्ये कूत्र्याने पाटीमागून येवून अचानकपणे हल्ला केला या हल्यात त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली. त्यानंतर त्यानां उपचारासाठी कसबा वाळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पूढील उपचारासाठी त्यानां सी. पी. आर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.