भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचा 56 वा वाचन कट्टा क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांचा जागर

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या 56 व्या वाचन कट्ट्यावर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनाचा कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीश चितळे होते या वाचन कट्ट्याचा विषय मी वाचलेले क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक समाजसेवक यांच्या विषयीचे पुस्तक प्रारंभी कार्यवाह आणि वाचन कट्टा संयोजक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून विस्ताराने प्रास्ताविक केले त्यानंतर दिवंगत साहित्यिकांना शहिदांना व देशवासीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले यावेळी देवयानी दिसले वहिनी नलवडे श्री जयदीप पाटील श्री सुभाष कवडे हनुमंतराव दिसले हनुमंत शिंदे रमेश चोपडे जयंत केळकर जी जी पाटील गुरुजी यांनी वाचलेल्या क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी व समाजसेवकांचा विस्ताराने परिचय करून दिला श्री मगदूम सर यांनी समारोप केला या वाचन कट्ट्यावर क्रांतिसिंह नाना पाटील शौर्य शालिनी भारतरत्न वसंत दादा पाटील रणरागिणी राजू ताई बिरनाळे जी डी बापू लाड यांच्या विषयीची चर्चा झाली उत्तम कांबळे यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या नवव्या भागाचे कथन केले यावेळी प्रमोद कुलकर्णी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहा महिलांना स्वखर्चाने वाचनालयाचे सभासदत्व दिले यावेळी ग्रंथ प्रेमी वाचक उपस्थित होते श्री जयदीप पाटील यांनी सर्वांचे आभार मानून स्वातंत्र्य सेनानी सोहनींचा परिचय सांगितला परिचय सांगितला कार्यक्रमाचे संयोजन वामन काटेकर विद्या निकम मयुरी नलवडे या वाचनालयाच्या सेवकांनी केले