विरोधकाचे डिपाॅझिट जप्त करा : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री. रेवंथजी रेड्डी
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचाराची सांगता सभा : दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

पलूस: (मुख्य संपादक अभिजीत रांजणे)
महागाई वाढवून भाजप सरकार ने शेतकरी, गरिबांचे हाल केले आहे. या घरी बसविण्याची वेळ आली आहे. डॉ विश्वजीत कदम यांचा विजय झाला आहे. परंतु आपणाला नुकताच विजय नको आहे तर विरोधकाचे डिपाॅजिट जप्त झाले पाहिजे, असे आवाहन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा. रेवंथजी रेड्डी यांनी काल पलूस येथील जाहीर सभेत केले.
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचाराची सांगता सभा काल पलूस येथे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा. रेवंथजी रेड्डी व ज्येष्ठ नेते, माजी आमदार मोहनराव (दादा) कदम यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, गेल्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत आपण मला प्रचंड मताधिक्याने विजयी कराल व यापुढेही आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.२० नोव्हेंबरला अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा.
यावेळी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद (भाऊ) लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रअप्पा लाड, शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख संजय विभुते, पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, गणपतराव पुदाले, विनायकबापू गोंदील, गिरीशकाका गोंदील, अभिजीत इनामदार, श्वेता बिरनाळे, अॅड. के. डी. कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तेलंगणाचे खासदार अनिलकुमार यादव, लोकनेते जे. के. बापू जाधव यांच्यासह काँग्रेस, महाविकास आघाडी व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.