क्रीडा

अर्णव पाटील व हित बदलवा अजिंक्य; विवान सोनी, अथर्व तावरे उपविजेते तर अद्वैत कुलकर्णी,अरिन कुलकर्णी तृतीय स्थानी ; पायोनियर चषक शालेय बूद्धिबळ स्पर्धा

 

कोल्हापूरः अनिल पाटील

चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉल मध्ये आयोजित केलेल्या मंगेशराव कुलकर्णी स्मृती अकरा व सोळा वर्षाखालील पायोनियर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात पाचवा मानांकित कोल्हापूरच्या अर्णव पाटीलने साडेसहा गुणासह अजिंक्यपद पटकाविले. अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी सहा गुण व 28.5 टायब्रेक गुणामुळे उपविजेता ठरला तर कोल्हापूरच्या अद्वैत कुलकर्णीला सहा गुण व 26 टायब्रेक गुण मिळवून तृतीय स्थानवर समाधान मानावे लागले. कोल्हापूरच्या अरिजीत पाटील व इचलकरंजीच्या आराध्य ठाकरे देसाई ने साडेपाच गुणांसह अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळविले. सोळा वर्षाखालील गटात द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या हित बलदवाने सात पैकी सात गुण घेत अजिंक्यपद पटकाविले.तृतीय मानांकित इचलकरंजीच्या अथर्व तावरेने सहा गुण व 31 टायब्रेट गुणासह उपविजेतेपद मिळविले. कोल्हापूर चा अरिन कुलकर्णी सहा गुण व 29.5 टायब्रेक गुणामुळे तृतीय स्थानी राहीला. कोल्हापूरच्या प्रणव मोरे व हातकणंगलेच्या आरुष ठोंबरे ला अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले. पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ने प्रायोजित केलेल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रदीप कारंडे, पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी, नितीन कुलकर्णी,मनोज कुलकर्णी, प्रज्ञा कुलकर्णी व योगिता कुलकर्णी, रो. डॉक्टर वैभव सासुरकर व डॉक्टर पूजा सासुरकर यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, भिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे व कॅन्डीडेट मास्टर अनिश गांधी उपस्थित होते. इतर बक्षीस विजेते *अकरा वर्षाखालील गट* 6) मितांश माने कोल्हापूर 7) श्वेतांक होवल लांडेवाडी 8) रुद्रवीर पाटील गडहिंग्लज 9) शर्मन सामंत कोल्हापूर 10) शर्विल पेटकर कोल्हापूर *अकरा वर्षाखालील गटातील उत्कृष्ट मुली* 1) अवनी सूर्यवंशी इचलकरंजी 2) ज्ञानेश्वरी मुळे कोल्हापूर 3) शर्वरी होवल लांडेवाडी. वर्षाखालील मुले *सोळा वर्षाखालील गट* 6) व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 7) विवेक पवार वारणानगर 8) मन्वीत कांबळे कोल्हापूर 9) अद्वय पाटील नेदरलँड 10) रुद्र माने इचलकरंजी *सोळा वर्षाखालील गटातील उत्कृष्ट मुली*. 1) समृद्धी खातोड इचलकरंजी 2) सृष्टी जोशीराव कोल्हापूर 3) नंदिनी सारडा इचलकरंजी *उत्तेजनार्थ बक्षीसे*. *पंधरा वर्षाखालील गट* 1) राजदीप पाटील कोल्हापूर 2) संस्कार काटकर कोल्हापूर 3) वरद तवटे सिंधुदुर्ग 4) आदित्य कोळी इचलकरंजी 5) सतेज पाटील वारणानगर 6) सोहम कुलकर्णी कोल्हापूर 7) रक्षण पाटील सांगली 8) अथर्व मोरे कोल्हापूर 9) सृष्टी पवार निपाणी 10) अभिनंदन पाटील कोल्हापूर *पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट मुली* 1) वेदिका मदने कोल्हापूर 2) स्नेहल गावडे कोल्हापूर 3) सान्वी कारेकर सिंधुदुर्ग *तेरा वर्षाखालील गट* 1) प्रेम गंगाराम निचल सेनापती कापशी 2) श्रवण ठोंबरे हातकणंगले 3) अर्णव र्हाटवळ कोल्हापूर 4) वेदांत कोडापे मोरेवाडी 5) अर्णव आंबीकर कोल्हापूर 6) श्लोक मलाबादे निपाणी 7) अविरत दीक्षित सांगली 8) ओम साखरपे कोडोली 9) समर्थ कोरे इचलकरंजी 10) यश हेंडगे कोल्हापूर *तेरा वर्षाखालील उत्कृष्ट मुली* 1) आरोही बनसोड कोल्हापूर 2) आरोही सायेकर कोल्हापूर 3) आर्या चोडणकर कोल्हापूर. *नऊ वर्षाखालील गट* 1) र्हिदम जोशी सांगली 2) आदिराज डोईजड वारणानगर 3) अवनीश जितकर कोल्हापूर 4) निलमाधव पिलाई कोल्हापूर 5) विहान अस्पतवार सिंधुदुर्ग 6) आरुष पाटील गडहिंग्लज 7) विहान भापकर इचलकरंजी 8) श्रीतेज वाली कोल्हापूर 9) संस्कार वणीरे कोल्हापूर 10) मयूर रणदिवे कोल्हापूर *नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुली* 1) अनुश्री गोरे कोल्हापूर 2) अक्सा मुजावर कोल्हापूर 3) नारायणी घोरपडे कोल्हापूर *सात वर्षाखालील गट* 1) चार्मी शहा इचलकरंजी 2) कौशिक राजाज्ञ कोल्हापूर 3) जोहान शेख कोल्हापूर 4) जयराज काजवे कोडोली 5) हर्ष कांबळे कोल्हापूर 6) स्वयम चव्हाण कोल्हापूर 7) प्रशांत माने कोल्हापूर 8) समर्थ पवार सातारा 9) मितांश चौगुले कोल्हापूर 10) अद्वय महाजन कोल्हापूर *सात वर्षाखालील उत्कृष्ट मुली* 1) अधिरा जैन इचलकरंजी 2) नक्षत्रा कांबळे कोल्हापूर 3) इनया मुजावर कोल्हापूर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आरती मोदी,विजय सलगर,अभिजीत चव्हाण, माधुरी पाटील, सचिन वणीरे व पायोनियर एनर्जीचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!