राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल कार्यक्रमांतर्गत जनजागृती फेरी काढून हिपॅटायटीस दिन साजरा

सांगली : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल कार्यक्रमांतर्गत दि. 29 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या जनजागृती करिता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली येथून राम मंदिर चौक व पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली या मार्गावरुन जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता शासकिय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, अधिक्षक डॉ. देवकारे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. स्मिता गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. छाया पाटील, कार्यक्रम प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी, वित्त अधिकारी महेंद्र खोत उपस्थित होते.
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील 35 जिल्ह्यामध्ये 28 जुलै 2019 पासून सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय या ठिकाणी 4 Model Treatment Center (MTC) व ३२ Treatment center (TC) यांची उभारणी करण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली यांच्या अधिनस्त राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल कार्यक्रम हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविला जात आहे. या कार्यक्रमाकरिता स्वतंत्र वैद्यकिय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत हिपॅटायटीस बी आणि सी रुग्णांची तपासणी आणि उपचार देवून हिपॅटायटीस चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता निदान व संदर्भित रुग्णांना उपचार व औषधोपचार तसेच लसीकरण केले जाते. हिपॅटायटीस बी संदर्भित मातेच्या बालकांना Hep. B Immunoglobin Inj उपलब्ध करून दिली जाते. आजअखेर सांगली जिल्ह्यांतर्गत या कार्यक्रमामधून सन 2019 पासून आजअखेर 52 हजार इतक्या संशयित रुग्णांच्या मोफत तपासण्या व पॉझिटिव्ह 26 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. आजअखेर हिपॅटायटीस सी चे एकूण 5 रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झालेले आहेत.
हा कार्यक्रमम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अधिनस्त अनिरुध्द लोंढे, पुनम पाटील, सुमित उपाध्ये, अभिजीत पाटील, निकेत वंजाळे यांचे सहाकार्य लाभले.