ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे उत्साहाने साजरी करण्यात आली.वाचनालयाचे हितचिंतक व अजीव सदस्य युवक कार्यकर्ते संभाजी महिंद यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाचनालयाचे वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे संचालक जयंत केळकर बाळासाहेब पाटील ग्रंथपाल मयुरी नलवडे मुख्य लेखनिक विद्या निकम प्रथमेश वावरे वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.