कृषी व व्यापारमहाराष्ट्र

पिकाचे खोडकीड / खोडमाशी पासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी : कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी संतोष चव्हाण

अंकलखोप, नागठाणे, सूर्यगाव, राडेवाडी येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी

 

पलूस : आपल्या पिकाचे खोडकीड / खोडमाशी पासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन संतोष चव्हाण कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस यांनी केले आहे.

 

मौजे कृषी अधिकारी कार्यालय पलूस यांनी  अंकलखोप, नागठाणे सूर्यगाव राडेवाडी येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले.ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन टोकणी अथवा पेरणी करावयाची आहे अशा शेतकऱ्यांनी खोडकीड व खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सोयाबीन बियाणाला थायमिथॉक्झाम 30 टक्के एफ एस ची बीज प्रक्रिया करावी. तसेच ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बीज प्रक्रिया करायची राहिली आहे. अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन टोकनी किंवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसाचा कालावधी झाला आहे. अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपले पीक खोडकीड / खोडमाशीच्या प्रादुर्भापासून वाचवण्यासाठी क्लोरॅन्ट्रीनिलीप्रोल १८.५ %( कोराजीन) किंवा क्लोरॅन्ट्रीनिलीप्रोल १०% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन ५% ( अॅम्प्लीगो ) या कीटकनाशकाची फवारणी करावी. व आपल्या पिकाचे खोडकीड / खोडमाशी पासून संरक्षण करावे, असे आवाहन संतोष चव्हाण कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस यांनी केले आहे.
सोयाबीन पिकाची पाहणी कृषी सहाय्यक संतोष चव्हाण व कृषी पर्यवेक्षक उदय दौंड यांनी शेतकरी यांच्या सोबत केली. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!