बस्तवडे येथे माता रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- बस्तवडे ता. कागल येथे त्याग मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सुरुवातीस प्रतिमा पूजन आयुष्यमती शालन बळवंत माने, प्रमिला गणपती कांबळे , बाळाबाई आनंदा ,कांबळे, पुनम धर्मेंद्र कांबळे , संजीवनी केरबा सावंत , व आनंदी शिवाजी पाटील , सुनिता दसरथ सुतार व विमल पुंडलिक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामुदायिकपणे बुद्ध वंदना व पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले. यावेळी माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. व सर्वांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकाश कांबळे , चरण वायदंडे, यशवंत कांबळे, किरण कांबळे , धर्मेंद्र कांबळे , आदित्य कांबळे, रणवीर खोडे, आदर्श कांबळे, रिया कांबळे , आर्या कांबळे, अरविका माने, श्रेया कांबळे इत्यादी महिला बंधू भगिनी हजर होत्या. यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नम्रता उत्तम कांबळे यांनी केले. तर शेवटी आभार प्राजक्ता धर्मेंद्र कांबळे यांनी मांडले. यावेळी त्या मूर्ती माता रमाबाई आंबेडकर प्रतिमापूजन च्या वेळी नम्रता उत्तम कांबळे यांनी भीमराज की बेटी हे सुंदर असं गीत गायले.व शेवटी सर्वांना धर्मेंद्र कांबळे यांनी खाऊ वाटप करण्यात आला.