जतच्या विकासासाठी विक्रम सावंत यांना मत द्या: डॉ विश्वजीत कदम
जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये डॉ विश्वजीत कदम यांचा प्रचार , संवाद

जत (मुख्य संपादक अभिजीत रांजणे)
जतच्या सर्वांगीण विकासासाठी जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत मताधिक्य द्या, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी बिळूर येथे झालेल्या जाहीर सभेस केले. तसेच जत येथे आयोजित डॉक्टर, वकील, व्यापारी यांच्या बैठकीस उपस्थित राहून संबोधित केले.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, विक्रमसिंह सावंत हे जत तालुक्याचे भूमिपुत्र असून, त्यांनी काँग्रेस पक्षाचा सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या कल्याणाचा विचार करून जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे काम केलं आहे. जत मतदारसंघात पायाभूत क्षेत्राचा विकास करण्याबरोबर कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सावंत यांनी प्रयत्न केले. विरोधी पक्षाचा आमदार असतानादेखील त्यांनी शासनदरबारी प्रयत्न करून मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, सिंचन आदी सर्व क्षेत्रातील प्रश्न सोडवले.
राज्यातील भाजप व महायुतीचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, त्यांच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळलेली जनता या निवडणुकीत परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. जत मतदारसंघाच्या प्रगतीला गती देण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला ‘हाताचा पंजा’ ला मोठ्या प्रमाणात मतदान करून विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा एकदा सेवेची संधी द्या, असे आवाहनही डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
यावेळी आ. विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले की, जत तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रेम केले आहे. जत तालुक्यातील अडचणी सोडविण्यासाठी मला पाठिंबा द्या, मत द्या, असे सावंत यांनी सांगितले.
यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, वकील, डॉक्टर, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.