क्राईममहाराष्ट्र
श्री क्षेत्र ज्योतीबा चे दर्शन घेवून परत येताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने भाविकाचा मृत्यू

कोल्हापूरः अनिल पाटील
श्री. क्षेत्र दखखनचा राजा जोतिबाचे दर्शन घेवून परत येत असतानां मंदीराच्या आवारात आज दूपारी एका भाविकाचा ह्लदयविकाराच्या झटक्याने मूत्यू झाला. शांताराम नारायण कदम वय 62 रा. मोरगाव पैकी भोईटेवाङी ता. बारामती जि. पूणे या भाविकाचा मूत्यू झाला.
काल मयत शांताराम व त्यांच्या पत्नी श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. आज सकाळी ते श्री क्षेत्र जोतिबा ‘चे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दूपारी दर्शन घेतल्यानंतर ते मंदीराच्या पायर्या चढत असतानां त्यानां ह्हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात आणले असता त्यांचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला. या घटनेची नोंद सी पी आर चौकीत झाली आहे.