भिलवडी येथील प्राची गायकवाड यांची सांगली जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षक पदी निवड
भिलवडी परिसरातून अभिनंदन अन् शुभेच्छाचा वर्षाव

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी गावचे माजी उपसरपंच श्रीकांत गायकवाड साहेब यांची पुतणी प्राची प्रशांत गायकवाड यांची एमपीएससीच्या परीक्षेतून सांगली जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षक पदी निवड झाली आहे.
प्राची गायकवाड यांचे शिक्षण बी ई इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाले. त्या एमएसईबी मध्ये नोकरी करत होत्या. परंतु लहानपणापासून उच्च पदावर प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा होती. आपल्या अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावरच एमपीएससीच्या परीक्षेतून प्राची गायकवाड यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षक पदी मानाचे स्थान मिळवले.
या निवडीमुळे प्राची गायकवाड यांनी आई वडील आणि गायकवाड कुटुंबाचेच नाही तर भिलवडी गावचे नाव उंचावले आहे. या यशस्वी निवडीमुळे प्राची गायकवाड यांचे भिलवडी परिसरातून अभिनंदन अन् शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.