आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

आदर्श पिढी घडवण्याचे काम शिक्षकांचे ; आर .एम . शिंदे

रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

 

दर्पण न्यूज टाकळीभान: राष्ट्रनिर्मिती मध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान असून आदर्श पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर . एम . शिंदे यांनी केले . विद्यालयात डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात आर . एम .शिंदे बोलत होते .यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एस . जरे , गुरुकुल प्रमुख श्रीमती एन . ए . पालवे, उपशिक्षक बी .व्ही .देवरे , सोमनाथ पटारे ,विद्यार्थी मुख्याध्यापक कार्तिक पटारे, विद्यार्थी पर्यवेक्षिका कु . दिपाली त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी महान शिक्षणतज्ञ ,मा .राष्ट्रपती डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. शिंदे पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे आई आणि वडील आपल्यावर संस्कार करतात त्याचप्रमाणे ज्ञानाची शिदोरी देण्याचे काम शिक्षक करत असतात . समाज व शाळा यांना जोडणारा दुवा शिक्षक आहे असे मत आर . एम . शिंदे यांनी व्यक्त केले . विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एस .जरे यांनी शिक्षकांची भूमिका केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्वांनी आपल्या शिक्षकांचा आदर ठेवला पाहिजे असे आवाहन केले . यावेळी विद्यार्थी मुख्याध्यापक कार्तिक पटारे व पर्यवेक्षिका कु .दिपाली त्रिभुवन यांनी त्यांना दिवसभरात आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले .यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी कु .तन्वी वाघुले, कु .श्रद्धा शिंदे, कु .श्रेया शिंदे , कु .पायल रासकर,कु .प्रिती गाढे,कु .ज्योती शेजाळ,सार्थक बहिरट यांनी मनोगत व्यक्त केले . विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व सेवकांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . योगिता गिते यांनी तर आभार ए .ए . पाचपिंड यांनी मानले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!