महाराष्ट्र

मिरज येथे जिल्हा प्रशासन, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने इंडियन ऑईल डेपोकडे जाणाऱ्या रोडजवळ ऑफ-साइट मॉक ड्रील  

 

            सांगली : – आपत्कालीन व्यवस्थापन अतंर्गत जनतेमध्ये जनजागृतीसाठी आपत्कालीन प्रसंगी सर्व संबंधित यंत्रणेची जबाबदारी, जनतेची जबाबदारी यांची जाणीव  करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मिरज यांचे सहकार्याने सांगली मिरज रोड जवळील इंडियन ऑईल डेपोकडे जाणाऱ्या रोडजवळ आज ऑफ-साइट मॉक ड्रील घेतले.

 

            आयओसीएल-बीपीसीएल डेपो क्षेत्राच्या अप्रोच रोडवरून पूर्ण भरलेला ट्रक आणि मुख्य रस्त्यावरून वळणावर येणारा रिकामा ट्रक यांच्यात टक्कर  अशा घटनेचा ऑफ-साइट मॉक ड्रील  मध्ये समावेश होता. या अपघाताची तात्काळ सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आले. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने परिस्थितीची पाहणी केली.

या MockDrill कावयातीचे नेतृत्व तहसीलदार श्रीमती अपर्णा धुमाळ यांनी केले. आणीबाणीच्या प्रतिसादात सामील असलेल्या सर्व भागधारकांमध्ये तत्परता आणि समन्वय वाढविण्यात अशा प्रकारच्या कवायती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे मत तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी व्यक्त केले.

तदनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील  रफिक नदाफ यांनी पोलीस, अग्निशमन दल, रेल्वे पोलीस, वाहतूक पोलीस, बीएसएनएल कार्यालय, एमएसआरटीसी मिरज आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासह विविध शासकीय अधिकाऱ्यांना यावेळी  मार्गदर्शन केले.

००००००

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!