अस्सल विनोदच मानवी जीवनाला नवसंजीवनी देईल : साहित्यिक विजय जाधव
सार्वजनिक वाचनालय भिलवडीचा ८४ व्या वर्धापदिन उत्साहात

भिलवडी
धकाधकीच्या व तणावग्रस्त जीवन शैलीमध्ये माणसाच्या मनामध्ये प्रचंड साचलेपणा निर्माण झाला आहे.परस्परांशी संवाद साधण्यासाठी देखील कोणाकडे वेळ उपलब्ध नाही.या परिस्थिती मध्ये ग्रामीण मतीतील अस्सल विनोदच मानवी जीवनाला नवसंजीवनी प्राप्त करून देईल असे प्रतिपादन साहित्यिक विजय जाधव यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या ८४ व्या वर्धापदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
सकाळ सत्रात प्रसाद ग्रंथ वितरण संस्था सांगली यांच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या हस्ते व मकरंद चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पाटील होते.
यापुढे बोलताना विजय जाधव म्हणाले की,भिलवडी सार्वजनिक वाचनालयाने वाचन चळवळ वृध्दींगत करण्यासाठी राबविलेले उपक्रम प्रेरणादायी असे आहेत.त्यांनी विविध विनोदी किस्से व अस्सल ग्रामीण ढंगात सादर केलेल्या कथकथनास उपस्थित रसिक श्रोत्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.
प्रास्ताविक व स्वागत जयंत केळकर यांनी केले.कार्यवाह सुभाष कवडे यांनी पाहुणे परिचय करून दिला सूत्रसंचालन मयुरी नलवडे यांनी केले.डी.आर.कदम यांनी आभार मानले.
जी.जी.पाटील,
ए.के.चौगुले,महावीर वठारे, प्रा.एम.आर.पाटील,संजय पाटील,प्रमोद कुलकर्णी,हकीम तांबोळी,सौ.उमा कोरे,देवयानी डिसले, सौ.विद्या निकम,वामन काटीकर आदी उपस्थित होते.