महाराष्ट्र

टीईटी’ अनिवार्यते मुळे केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक आरक्षण न्याय धोरणास धक्का बसेल : मा. आकाश तांबे

दर्पण न्यूज  पुणे  :- कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची सभा नवीन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद पुणे येथे नुकतीच पार पडली. या प्रदेश कार्यकारणी सभेसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष व कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 17 ठराव मांडण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालानुसार शिक्षकांना येत्या दोन वर्षांत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.   सर्व संवर्गातील शिक्षक वर्ग शिक्षण विभागामधून बाहेर पडतील. या पार्श्वभूमीवर कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य  अध्यक्ष आकाश तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. 15 मार्च 2024 संचमान्यतेचा काळा जीआर रद्द करण्यात यावा, एससी एसटी या संविधानिक पदाचे पदोन्नती मधील आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली, आश्वासित प्रगती योजना 10.20.30 चा लाभ शिक्षकांनाही लागू करण्यात यावा, अशैक्षणिक कामकाजातून शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे ठराव मांडण्यात आले.अशी माहिती वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत  यांनी दिली आहे.

राज्य अध्यक्ष आकाश तांबे  यांनी आपल्या पत्रात आरटीई कायदा २००९ मधील कलम २३, राष्ट्रीय

अध्यापक शिक्षण परिषदेची अधिसूचना (२३ ऑ गस्ट २०१०) तसेच महाराष्ट्र शासनाचा आदेश (१३ फेब्रुवारी २०१३) यांचा स्पष्ट संदर्भ देत त्या तारखांपूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ ही व्यावसायिक

कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश तांबे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

पात्रता लागू नसल्याचे अधोरेखित केले आहे. शिवाय, केवळ ५ टक्के इतक्या अल्प निकालाच्या परीक्षेमुळे २०-२५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि किमान
शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या शिक्षकांचे सेवासातत्य धोक्यात येणे अन्यायकारक ठरेल, असे मत नोंदवले आहे. शिक्षकांच्या सेवा संरक्षणासाठी केंद्र शासनाने तातडीने आरटीई कायद्यात आवश्यक सुधारणा कराव्यात, तोपर्यंत वटहुकमाद्वारे उपाययोजना करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेच्या माध्यमातून राज्य शासनाने भूमिका घ्यावी व राज्यातील सुमारे सहा लाख शिक्षकांच्या भवितव्याशी निगडित या महत्त्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक पावले उचलतील, अशी मागणी आकाश तांबे यांनी केली आहे, अशी माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे  वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांनी दिली आहे.

या सभेचे वेळी मा. शिक्षक नेते श्री रवींद्र पालवे  ( सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ) यांचा सेवानिवृत्त सत्कार राज्याचे अध्यक्ष मा. आकाश तांबे व कार्याध्यक्ष मा. किरण मानकर यांच्या हस्ते करण्यात आला. विविध विभागातून सेवानिवृत्त  झालेले कर्मचारी व शिक्षक यांचा सेवापूर्ती सत्कार  व विविध परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विभागीय अध्यक्षपदी धम्मपाल उघडे नियुक्त

कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अध्यक्षपदी परभणी जिल्ह्यातील जि. प. शाळेचे शिक्षक धम्मपाल एकनाथराव उघडे यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष आकाश तांबे आणि सरचिटणीस खींद्र पालवे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात घेण्यात आली. त्यात ही निवड झाली.

या कार्यक्रमाची वेळी राज्याध्यक्ष आकाश तांबे, सरचिटणीस रवींद्र पालवे, कार्याध्यक्ष किरण मानकर, मुख्य संघटन सचिव प्रभाकर पारवे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, उपाध्यक्ष श्रीशैल कोरे, कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे, कास्ट्राईब  शासकीय कर्मचारी महासंघाचे महासचिव दिलीप पवार, मुख्य संघटन सचिव राजू रणदिवे, संतराम कांबळे,प्रमोद काकडे, दयानंद सरवदे, सुरेश कोळी, उत्तम मंगल, बुद्धिवान आंबवडे, बाजीराव काळे, सोमलिंग कोळी, डॉ. सिद्धार्थ मस्के, धम्मपाल उघडे, सुभाष म्हस्के, तुषार आत्राम, महेश रुद्रे, रत्नाकर डोंगरे,सर्जेराव चव्हाण, अर्जुन राठोड,संजय कुर्डूकर, पी डी सरदेसाई , विजय कांबळे, प्रशांत मोरे, संजय खरात, बाळकृष्ण भंडारे,
सुषमा प्रशांत मोरे,कांचन सावंत,मिनल कळके,
मनिषा गायकवाड,भिमराव बनसोडे,अरुण सर, गोकुळ वाघ, नागोराव कोम्पलवार,मा. योगेश गायकवाड अध्यक्ष दापोडी शाखा प्रो. मिलिंद बनकर सर., मा. डॉ. कैलास डोकळे सर, मा. बाळासाहेब बहुले ससून मा. खोब्रागडे साहेब,मा.किशोर साबळे संपादक महाराष्ट्र प्रहार मा. परशुराम गंगणार संपादक, मा. दीपकजी म्हस्के प्रसिद्ध मा.प्रवीण धीवार पुणे विभागीय अध्यक्ष कल्याण महासंघ निवेदक, शुभम कांबळे, रामदास नाटेकर, खैरनार, सुनील गस्ती, समीर नाईक सर,संजीव मोहिते सर. , एन पी कांबळे. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीचे संचालक व तालुका अध्यक्ष दापोली चे बिपिन मोहिते,संगमेश्वर चे संचालक सचिव हिरालाल चावरे रत्नागिरी तालुकाध्यक्ष उमेश तायडे, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी एस.टी सेल प्रमुख कुणाल तडवी जिल्हा अध्यक्ष प्रदीप वाघोदे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!