सांगली जिल्ह्यात खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप दाखल

सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कवठेमहांकाळ – तासगाव, विटा, जत आणि पलूस – कडेगाव मतदारसंघांसाठी मा. भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप (आय. आर. एस.) सी व सीई यांचे सांगली जिल्ह्यामध्ये आगमन झाले आहे. त्यांच्या कार्यालयाचा पत्ता जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्ष हा स्थायी समिती (राजाभाऊ जगदाळे सभागृह) सभागृह, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, सांगली येथे आहे. त्यांच्या ई मेल आयडी expenobserversangli@gmail.com असा असून, भ्रमणध्वनी क्रमांक 9307949547 असा आहे.
खर्च निरीक्षक कवठेमहांकाळ – तासगाव, विटा, जत आणि पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून आढावा घेणार आहेत. या मतदारसंघांतील उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास दिलेल्या ई-मेल अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खर्च निरीक्षण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.