मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील न्यायालयीन बदली कामगाराचा अश्रुपूर्ण निरोप समारंभ

दर्पण न्यूज मिरज :- सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील न्यायालयीन बदली कामगार श्री. सुनिल शंकर हातेकर हे वयोमानानुसार आज सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी गेल्या २५ ते ३० वर्षे प्रामाणिकपणे शिपाई पदावर सेवा बजावली.
तथापि, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना निवृत्तीवेळी कोणतेही शासकीय लाभ मिळाले नाहीत व रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
या प्रसंगी सहकारी बांधवांनी आयोजित केलेल्या निरोप समारंभात श्री. हातेकर यांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की :
“संपूर्ण आयुष्यभर प्रशासनाने सांगितलेल्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा केली. मात्र उतरत्या वयात माझ्या भविष्यासाठी मला शासनाने वा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकही दमडी दिली नाही. माझे नुकसान झाले आहे, परंतु माझ्या बांधवांना तरी न्याय मिळावा, हीच माझी नम्र विनंती आहे.”
कार्यक्रमास मा. अधिष्ठाता, अधीक्षक तसेच इतर कोणतेही प्रशासकीय मान्यवर उपस्थित नव्हते. हातेकर यांच्या या शब्दांनी बदली कामगार तसेच समस्त उपस्थितांचे डोळे पाणावले.
न्यायालयीन बदली कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, निवड समिती गट – ड सांगली यांनी व्यक्तीश: लक्ष घालावे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अशा कामगारांना न्याय मिळवून द्यावा, ही सर्वांची अपेक्षा आहे.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने ठामपणे सांगितले आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, आपली नियुक्ती झाल्यापासून सेवानिवृत्त झाले पर्यंत सर्व फरकासहित फंड सर्विस ग्रॅज्युटी इतर कामगार कायदे नुसार इतर लाभ सुविधा मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली कटिबद्ध आहेत.
यावेळी, यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा सदस्य रूपेश तामगावकर, विशाल कांबळे, किशोर आढाव यांच्या बरोबरच न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड, महोन गवळी, प्रकाश गायकवाड, शोभा पोतदार, सुमन कामत, धर्मेंद्र कांबळे, अनवर कुरणे, शशिकांत जाधव, मुरलीधर कांबळे, मनोज कांबळे, रशीद सय्यद, रमेश साळुंखे, सुनील आवळे, राजु कांबळे, संजय कांबळे, भारत खाडे, शरद कांबळे, राजेंद्र आठवले, महोन आवळे, किरण वायदंडे, बापू वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.