खंडोबाचीवाडी येथील अनेक कार्यकर्तेचा भाजपमध्ये प्रवेश : संग्राम देशमुख यांची उपस्थिती :
काँग्रेस पक्षामध्ये पोकळी निर्माण झाल्याची लोकांमध्ये चर्चा

पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघातील खंडोबाचीवाडी ता. पलूस येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख मा. संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामध्येविकास पवार, आशिष मदने, विनायक पवार, आकाश शिंदे, अक्षय शिंदे, अक्षय पवार, प्रशांत शिंदे, सुधाकर पवार, अविनाश बंडगर, अरुण जाधव, प्रमोद शिंदे, प्रसाद गायकवाड, ज्योतीराम शिंदे, पांडुरंग चेंडगे, अभिनंदन जाधव, रोहित कापसे, विक्रम शिंदे, प्रवीण शिंदे, बबन मदने, निखिल शिंदे, दशरथ सावंत, विशाल मोटकट्टे, बाबासाहेब मगदूम या कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख मा. संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.*
खंडोबाचीवाडी येथील ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे शिर्षस्थ नेतृत्व व माझ्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला, त्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. आगामी काळात तुमचे कोणतेही छोटे-मोठे काम किंवा समस्या असू द्या, मी तुमच्यासोबत खांद्याला-खांदा लावून उभा राहील असा विश्वास संग्राम भाऊ देशमुख यांनी व्यक्त केला.,
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मा. सुरेंद्र भैय्या वाळवेकर, रमेश दादा पाटील, सर्जेराव शिंदे, तानाजी भोई, दिलीप दादा धनवडे, पोपट नाना जाधव, कुलकर्णी साहेब, श्रीकांत बापू निकम, दत्ताभाऊ उथळे, हेमंत जगदाळे, विश्वजीत पाटील, सागर सूर्यवंशी, बाळासाहेब चेंडगे, पोपट जाधव, चंद्रकांत बाबर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व माझे सहकारी उपस्थित होते.