बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी

सांगली: इस्राईलमध्ये नोकरीच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्राईल मधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. श्री.मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मा. मंत्री श्री. लोढा म्हणाले की, भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईल मध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ऑफ लाईन अर्ज करण्याकरिता जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, विजयनगर, सांगली ४१६ ४१५ दूरध्वनी क्र. ०२३३ – २९९०३८३ येथे इच्छुकांनी संपर्क साधावा.
फ्रेमवर्क/ शटरिंग कार पेंटर, बार बेंडिंग, मेसन, सिरेमिकटाइलिंग मेसन, प्लास्ट रिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईल मधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा 16,000 रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल.
या पदासाठी 21 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. त्याच प्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया चॅनेलला भेटद्या आणि सामील व्हा, असे आवाहन जमीर करीम, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांनीकेले आहे.
- संकेतस्थळ : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic
- संपर्क : ८७९६८४४३२० (ऋषिकेश जाधव -जिल्हा कौशल्य विकास समन्वयक)
- व्हाट्सअपचॅनल : https://whatsapp.com/channel/0029VaFSFjiKmCPXrP0ncr38
- टेलिग्रामग्रुप : https://t.me/maharashtrainternational
- लिंक्डइन : https://shorturl.at/hpwQW
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी QR क