कोल्हापूरच्या अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख यांना 25 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूर अनिल पाटील
तक्रारदार यांचे किणी,ता. हातकणंगले येथे मे.सम्राट फुडस नावाचे रेस्टाॅरंट आहे.दि.१५/०३/२०२४ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख यांनी तक्रारदार यांचे नमूद रेस्टोरेंटवर तपासणी करून अन्न पदार्थांचे नमुने घेतले व तक्रारदार यांना सदरबाबत कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांच्याकङून १,००,०००/-रू.ची मागणी करून तडजोडीअंती ७०,०००/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहीला हफ्ता २५,०००/-रू.लाच रक्कम स्वता स्विकारतानां श्रिमती किर्ती धनाजी देशमूख वर्ग 2 पद अन्नसूरक्षा अधिकारी””नेमणूक अन्न व औषध प्रशासन कार्यालय कोल्हापूर” रा. विश्र्व रेसीङेन्सी”फ्लॅट नं 202”ताराबाई पार्क कोल्हापूर’ मूळ पत्ता समर्थनगर मोहोळ जिल्हा. सोलापूर यानां त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये रंगेहात पकडण्यात येवून त्यांच्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस अंमलदार :- श्रेणी पो उपनि बंबरगेकर,सफौ भंडारे,पोह/सुधीर पाटील,मपोकाॅ पूनम पाटील आदीनी केली.