कृषी व व्यापारमहाराष्ट्र

गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेंतर्गत पात्र संस्थांकडून अर्ज स्वीकारण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

 

        सांगली : पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात गोवंश गोवर्धन सेवा केंद्र ही योजना नवीन स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र संस्थांकडून अर्ज स्वीकारण्यास दि. 31 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी दिली.

            सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे तसेच दि. 24 जून 2017 च्या शासन निर्णयातील ज्या 32 तालुक्यातील गोशाळांना अनुदान देण्यात आलेले आहे.  हे तालुके वगळून 34 जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यामध्ये एक याप्रमाणे 324 तालुक्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सन 2023-24 या वर्षासाठी 324 तालुक्यामधून सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या योजनेसाठी पात्र गोशाळांकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेंतर्गत लाभार्थी गोशाळांची निवड मधील वेळापत्रक सुधारीत करण्यात आले असून यानुसार पात्र संस्थांकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत 31 जुलै 2023 पर्यंत आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी काही  संबंधित तालुक्यातील सहाय्यक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी विस्तार येथे  संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!