दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
भूम, दि. ११ ऑगस्ट २०२६ :मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भूम व वाशी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन पिकअप वाहनांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता धाराशिव-बीड राष्ट्रीय महामार्गावरील दहिफळ शिवारातील विश्वजित ढाब्याच्या पाठीमागे दोन संशयित पिकअप वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-23-AU-5810 व अशोक लेलँड पिकअप क्र. MH-14-EM-5173 या वाहनांचा समावेश होता.तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामध्ये ‘गोवा १०००’ गुटखा, ‘केसरीयुक्त विमल पान मसाला’, ‘व्ही-१ सुगंधित तंबाखू’, ‘शॉट ९९९ सुगंधित तंबाखू’ व ‘डायरेक्टर स्पेशल पान मसाला’ आदी पदार्थांचा समावेश आहे.कारवाईदरम्यान ₹६,५८,५२३ किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच अंदाजे ₹१०,००,००० किमतीची दोन पिकअप वाहने, असा एकूण ₹१६,५८,५२२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रोहित दिनेश फंदी (वय २५ वर्षे) यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाणे गुन्हा क्र. २६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही वाहनांमधून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज असून, वाहनांचे अज्ञात चालक व या अवैध वाहतुकीमागील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सदर कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, श्री. कानगुडे,सपोनि श्री. खांडे, श्री. सावंत, पोलीस उपनिरीक्षक श्री.बर्डे, श्री. झराड तसेच भूम व वाशी पोलीस ठाण्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
