कोल्हापूर : अनिल पाटील :-
पेंढारवाडी ता आजरा येथील श्रीमती जनाई विष्णुपंत आजगेकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी याचे गुरूवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले.
सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री विजय आजगेकर, आजरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विनायक आजगेकर , मृदू व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री बाळासाहेब आजगेकर यांच्या त्या मातोश्री तर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे संगणक सहाय्यक श्री अविनाश आजगेकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पेंढारवाडी तालुका आजरा येथे आहे.
