


दर्पण न्यूज पलूस भिलवडी ( अभिजीत रांजणे):- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील कै. अनिल शिरगावकर आण्णा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अंकलखोप या संस्थेचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला . या कार्यक्रमाला मानसिंग बँकेचे संस्थापक मा. जे. के. बापू जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्व. बापूसाहेब शिरगावकर दादा कै. अनिल शिरगावकर अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर पतसंस्थेच्या वतीने पाहुण्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. जेके बापू जाधव यांनी सांगितले की ,कै अनिल शिरगावकर आण्णा पतसंस्थेचा कारभार योग्य असून या पतसंस्थेचे संस्थापक अजित शिरगावकर अंकल हे नेहमीच आमच्याशी एकनिष्ठ राहिले असून भविष्यकाळात नक्कीच त्यांचा फायदा होईल. यापूर्वी मान्यवरांनी भाषणे केली. या भाषणात अनेक प्रकारचे तथ्य असून आजकाल एखादी संस्था चालवणे मोठे कठीण झाले आहे. परंतु शिरगावकर पतसंस्था अत्यंत चांगल्या प्रकारे चालते. सतत या संस्थेने अ वर्ग घेतलेला आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा भागत आहेत. यापुढेही अशाच प्रकारे या पतसंस्थेच्या चेअरमन, कर्मचारी आणि सभासदांनी सामाजिक बांधिलकी जपत पतसंस्था चालवावी. संस्थेला माझ्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा अशा भावना जे के बापू जाधव यांनी व्यक्त केल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन अजित शिरगावकर अंकल यांनी सांगितले, की पतसंस्थेला नेहमीच सभासद हितचिंचकांचे सहकार्य लाभले आहे. या पतसंस्थेचा 21 वा वर्धापन दिन साजरा करत असताना या संस्थेला नेहमीच ऑडिट अ वर्ग मिळालेला आहे.
यावेळी विश्वनाथ मिरजकर, सुरेंद्र चौगुले, माने सर, संपत पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास अशोक शिरगावकर, सुरेंद्र चौगुले, दिलीप जाधव, सुनील चौगुले, प्रल्हाद पाटील, अभय बिरनाळे ,भास्कर चौगुले, बाळासो सूर्यवंशी, दिलीप सावंत,पि के पाटील सुभाष चौगुले, कुंभार सर, दिनकर सूर्यवंशी गुरुजी ,हेमंत मिरजकर खंडू मामा मिरजकर,
प्रमोद जाधव , किरण चव्हाण, अरुण सावंत शितल बिरनाळे, अनिल जाधव, हणमंत बापू पाटील, गजाभाऊ सूर्यवंशी, अनिल विभूते, विकास सूर्यवंशी, राजेंद्र चौगुले, संकपाळ सर, रोकडे सर, पत्रकार अभिजीत रांजणे, चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सल्लागार, सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी वर्ग हितचिंतक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव स्वाती मोटकट्टे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संचालक आनंदराव सूर्यवंशी यांनी मानले.
