करजगी येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नरराधमाला फाशी द्या : भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची मागणी*

दर्पण न्यूज मिरज ;- जत तालुका करजगी येथील चार वर्षीय लहान बालिकेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नरराधमाचे गुप्तांगण छाटून टाकावे किंवा लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी. मयत मुलीच्या घरच्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शासनाकडे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जमीर शेख यांनी मिरज प्रांताद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे व वरील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये असले अमानुष व माणुसकीला काळिंबा फासणारे कृत्य करताना गुन्हेगार स्वप्नातही विचार करणार नाही अशा पद्धतीने शासनाने कडक कायदे करावे तसेच शासनाने गुन्हेगारांना तातडीची फाशीची तरतूद करण्यात यावी किंवा गुप्तांगण छाटण्याची तरतूद करावी व शासनातर्फे उज्वल निकम या वकिलांची नियुक्ती करावी असे निवेदन देताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते