भिलवडी येथे उसाचा ट्रॅक्टर पलटी ; चार दुचाकींचा चक्काचूर : मोठा अनर्थ टळला
बघ्यांची गर्दी ; भिलवडी पोलिसांचे अथक प्रयत्न ; रात्री उशिरा वाहन रिकामं

भिलवडी: -सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मुख्य बाजारपेठत रात्री आठच्या दरम्यान उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. यामध्ये रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या चार दुचाकींचा चक्काचूर झाला. रविवार भिलवडी चा आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी होती. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
चार दुचाकींवर पडलेल्या उसाचा ट्रॅक्टरला बाजूला करण्यासाठी रात्री उशिरा झाला. बघ्यांची मोठी गर्दी केली होती. भिलवडी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले. लोकांनीही चांगले सहकार्य केले.
भिलवडी येथे रविवारी आठवडी बाजार असल्याने बाजारात लोकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे उसाने भरलेले ट्रॅक्टर आणि इतर वाहने रात्री दहा नंतर साखर कारखानदार यांनी घेऊन जावेत, अशी मागणी लोकांतून होत आहे.
आज भिलवडी गावातील मोठा अनर्थ टळला. मात्र, पुढील खबरदारी घेतली पाहिजे, असेही लोकांचे म्हणणे आहे.