दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आज एक ऑगस्ट 2026 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
भिलवडीतील युवा सामाजिक कार्यकर्ते बंडू गायकवाड आणि लघु उद्योजक कारंडे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाचे वतीने अभिवादन करण्यात आले.
स्वागत आणि प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी केले.
यावेळी बंडू गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. गायकवाड आणि कारंडे यांचा वाचनालयाचे वतीने ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष डी आर कदम प्रथमेश वावरे ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखनिक विद्या निकम वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.
