दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):-लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी.बी.एस.ई. मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वात प्रथम प्रशालेमध्ये माता सरस्वती, महर्षी व्यास, आणि हणमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर शाळेतल्या संगीत विभागातील मुलींनी वेगवेगळी गीते सादर केली. तसेच शाळेतील विद्यार्थी कु. शौर्या तळेकर आणि कु.आर्यन कटरे यांनी गुरुपौर्णिमा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे आणि आयुष्याला योग्य दिशा देणारे गुरु हेच खऱ्या अर्थाने जीवनाचे शिल्पकार असतात. असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य माननीय.श्री.अवधूत खरात यांनी केले.या गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सदाशिवरावभाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. हा सर्व कार्यक्रम संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय श्री पी. टी.पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ. राजश्री चव्हाण तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.रजनी तळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या विशेष प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता पवार आणि नम्रता पवार या विद्यार्थिनींनी केले तर रितिका खाडे हिने आभार मानले.
