दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
वयोवृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या कारवाईत 02 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹36,000 किमतीचे मनी मंगळसूत्र व OPPO कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आणखी एका चोरीच्या गुन्हयाची कबुली दिल्याने एकूण दोन गुन्हयांची उकल झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी कासार व पथक यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलीस स्टेशन शिराढोण गु.र.नं. 162/2026 | मधील आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी सदर गुन्हयासह पोलीस स्टेशन भूम गु.र.नं. 423/2026 या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचीही कबुली दिली.
या कारवाईत शिवराम उर्फ बेवड्या धनाजी पवार (वय 21) रा लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा व | आकाश उर्फ बबलू दादाराव पवार (वय 19) रा. मोहा पारधी पेढी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या आणखी एका साथीदाराचा सहभाग निष्पन्न झाला आहे. आरोपींकडून मनी मंगळसूत्र व OPPO कंपनीचा मोबाईल असा ₹36,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना पोलीस स्टेशन शिराढोण यांच्या ताब्यात | देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई श्रीमती रितू खोखर, पोलीस अधीक्षक, धाराशिव व श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि. सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, पोह. प्रकाश औताडे, पोह. जावेद काझी, पोह. फरहान पठाण, चापोह. नागनाथ गुरव, चापोह. रत्नदीप डोंगरे तसेच QRT पथक, धाराशिव यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
