दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) -:
दि.27.07.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यात मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणे व अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करीत असताना आळणी चौक येथे आले असता पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अशोक लिलॅड टेंम्पो वाहन क्र एमएच 25 एजे 6586 व पिकअप वाहन क्र एमएच 25 पी 4259 या मध्ये जर्सा गायी असे प्राणी कत्तल करण्याकरीता येडशी कडून धाराशिव कडे घेवून जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आळणी चौक येथे 13.30 वा. चे सुमारास रोडवरुन अशोक लिलॅड टेंम्पो व पिकअप येत असताना दिसल्याने त्यांना बातमी प्रमाणे सदरच्यावाहनांचा संशय आल्याने त्यास हात दाखवून थांबवून नमुद चालकास त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) दशरथ शंकर जगदाळे, वय 52 वर्षे, रा. हिवरा ता. भुम जि. धाराशिव, 2) बालाजी भिकाजी सोनवणे, वय 38 वर्षे, रा. भोनगिरी ता. भुम जि. धाराशिव असे असल्याचे सागिंतले वरुन पोलीस पथकाने वाहनाच्या पाठीमागे जावून पाहणी केली असता सदर अशोक लिलॅड टेम्पो व पिकअप वाहनामध्ये अंदाजे 3,05,000₹ किंमतीचे 8 गायी दोन वासरे बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करीत असताना मिळून आल्याने त्याचे ताब्यातुन अंदाजे 3,05,000₹ किंमतीचे गायी दोन वासरे वाहनासह असा एकुण 18,05,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे 11) दशरथ शंकर जगदाळे, वय 52 वर्षे, रा. हिवरा ता. भुम जि. धाराशिव, 2) बालाजी भिकाजी सोनवणे, वय 38 वर्षे, रा. भोनगिरी ता. भुम जि. धाराशिव यांचे विरुध्द धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, सफौ अश्विन जाधव, पोलीस हवालदार समाधान वाघमारे, मपोहा शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, केदार शेरखाने पोलीस मुख्यालय येथील QRT पथकाचे अंमलदार यांचे पथकांनी केली आहे.
