दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार):-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर पोलीस ठाणे हद्दीत घडलेली घटना अशी की, विटा मायणी रोडवरील ( नागेवाडी नागनाथ नगर,) येथे यशवंत सहकार साखर कारखान्यापासून काही अंतरावर विटा येथून आपल्या स्वतःच्या दुचाकी मोटारसायकलवरून नागेवाडी नागनाथ नगर येथून शिवाजी अर्जुन जावीर, हा मोटारसायकल चालक आपल्या दुचाकीवरून विटयाकडे जात असताना विटयाहून मायणीच्या दिशेने सुसाट वेगाने चाललेला पिक अपची या दोन्ही वाहनांच्या जोराची धडक झाली, ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीला जवळपास फरफटत नेले,हा अपघात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विटा मायणी रोडवरील नागेवाडी नागनाथ नगर येथे घडला, या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी पोचले,त्यांनी जखमींला विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले,मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले,सदर घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी सांगितले की,पिक अप इतक्या जोराने आणि सुसाट वेगाने होता की , दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे, या घटनेची माहिती मिळताच विटा पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली तर पंचनामा केला, या अपघाता संदर्भात विटा पोलीस ठाण्यात पांडूरंग तातबो जावीर यांनी फिर्याद दाखल केली,या अपघाताची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा तपास विटा पोलीस करीत आहेत.
