

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):–21 जुलै 2026 वार मंगळवार रोशन ए आलम शिक्षण संस्था संचलित रहमत अँग्लो उर्दू हायस्कूल विटा मध्ये विटा नगरीचे जेष्ठ पत्रकार माननीय श्री सिराज भाई शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात रहमत अँग्लो उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री मोमीन खलील अहमद सरांच्या प्रस्ताविकाने झाली आपल्या प्रस्ताविक परभाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ पत्रकार शिराज भाई शिकलगार यांची ओळख आणि त्यांच्या कार्याची माहिती करून दिली त्यांचा आदर सत्कार केला त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आलमगीर हाजी रोशन मुल्ला साहेब यांनी आपल्या मनोगतात इयत्ता आठवी मध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री सिराज भाई शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या उद्बोधन पर व्याख्यानात विद्यार्थ्यांनी शाळेत येताना व जाताना ज्या अडचणी येतात त्यावर कशी मात करावी आणि जे विद्यार्थी शाळेत स्वतः बाईकने येतात त्याबद्दल असणारे कायदे होणारी शिक्षा होणारी सजा याविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी रहमत अँग्लो उर्दू हायस्कूल चे शिक्षिका सौ मोमीन मॅडम कुमारी नया घर मॅडम श्री सत्तार सर श्री आंबी सर श्री गुफरान श्री मुजम्मिल उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्री मुल्ला सरांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
