
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार):—सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम, यांच्या आदेशानुसार व देखरेखीखाली व विटा उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सदाशिव शेलार व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे हद्दीत ११२ डायल झाल फोन आला की तातडीने ठाणे अंमलदार यांच्याकडे गाडी नोंद करणे तसेच विटा पोलीस ठाणे प्रभारी पोलिस अधिकारी यांना सांगणे, कॉल डिटेल्स, तसेच गोपनीय अंमलदार यांनाही या संदर्भात माहिती देत ही ११२ पोलीस व्हॅन तातडीने ११२ काॅल आलेल्या ठिकाणी तातडीने केवळ ६ ते ७ मिनटात पोहचते , आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी एखादी घटना घडू नये या अनुषंगाने आणि या उद्देशाने सुरू करण्यात आलेले डायल ११२ या एकात्मिक आपत्कालीन सेवा प्रणालीत सांगली जिल्हा पोलीस दलात विटा पोलीस ठाणे कडील ११२ या सेवेची दमदार कामगिरी पोलीस अंमलदार करताना दिसत आहेत. सध्या तक्रारदारांनी फोन केल्यानंतर अवध्या सात मिनिटात त्यांना प्रतिसाद मिळत आहे हे सुद्धा चित्र दिसून येत आहे. विटा पोलीस ठाण्यात तसे दररोज सुमारे ३०ते ३५ फोन तरी आधी११२ चे कॉल प्राप्त होतात. यामध्ये अनेक कॉल किरकोळ कारणासाठी असले तरी गंभीर तक्रारींवर पोलिस तातडीने कारवाई करण्यासाठी सातत्याने कर्तव्यदक्ष कामगिरी करताना दिसून येते आहे, ही यंत्रणा ऑनलाइन असून नागरिकांचा कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस ठाणे आणि पथकाला तात्काळ सूचना दिल्या जातात. त्यानंतर पोलीस संबंधित ठिकाणी जाण्यास निघतात. अर्थात सध्या आधुनिक लोकेशन ट्रेकिंग प्रणालीमुळे घटनास्थळी जलद पोचणे शक्य होत आहे. ११२ चे चालक खबरदारी घेत रस्त्यावर पोलीस व्हॅन चालवताना खबरदारी घेतात गाडी कंट्रोल करून घटनास्थळी वेळेत पोहोचते कोणतीही दुर्घटना घडू नये याची सुद्धा खबरदारी या 112 चे चालक घेत असतात. त्यामुळे विटा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार साहेब यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता थेट ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे, प्रशिक्षित कर्मचारी २४ तास सेवेत उपलब्ध असून कमीत कमी वेळेत मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, तसेच अपघात ग्रस्त ठिकाणी वेळेत ११२ ही पोलीस व्हॅन पोहोचत असते, या कार्यक्षम सेवेमुळे विटा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी विटा पोलिसांचे या दमदार कामगिरीबद्दल व डायल ११२ चे कौतुक केले आहे, तसेच शालेय कॉलेज विद्यालय हायस्कूल विद्यार्थिनी व शालेय मुलांनी संकटकाळी वेळप्रसंगी आपण डायल ११२ ला कधीही फोन करू शकता आपल्या सेवेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
कोणतीही घटना घडलेली नसेल तर 112 ला कॉल करू नका : पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे
विटा पोलीस ठाणे हद्दीत ११२ या पोलीस व्हॅनची दमदार कामगिरी दिसून आली आहे, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे संतत या पोलीस व्हॅनवर करडी नजर ठेऊन असतात, गाडी घेऊन जाताना या गाडीच्या चालकाने डायरील गाडी नोंद करून ठाणे अंमलदार यांना दैनंदिन सुचना ११२ कॉल आल्यानंतर जाण्या अगोदर देणे गरजेचे आहे, लवकरात लवकर घटनास्थळी गाडी कशी पोहोचेल याची खबरदारी शिस्त पद्धतीने गाडीचे चालक यांनी घेणे गरजेचे आहे, सदर घटनास्थळी विटा पोलीस ठाण्यातील कमीत कमी ३ कर्मचारी या गाडी बरोबर घटनास्थळी जाताना दिसून येतात, तसेच ११२ ला जर कोणतीही घटना घडली नसेल अथवा विनाकारण जर कोणी 112 ला कॉल केला आणि त्या ठिकाणी जर काहीच घडले नसेल तर मात्र विनाकारण 112 ला कॉल करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते, कोणीही कोणतीही घटना घडलेली नसेल तर मात्र 112 ला कॉल करू नका, असेही पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले,तर ११२ या संदर्भात संपूर्ण माहिती पत्रक विटा पोलीस ठाणे अंमलदार आपणास देतील, विट्यातील रुग्णवाहिका आणि विटा पोलीस ठाणे कडील ११२ ही पोलीस व्हॅनचे स्पीड अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पीड क्रमांक प्रमाणे राहत असते, या दोन्ही वाहनांच्या चालकांनी गाडी चालवताना मोबाईलवर पूर्णपणे वापरण्यास बंदी घातली आहे.
