दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):-विटा येथील आदर्श पॉलिटेक्निक कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागांतील ०९ विद्यार्थ्यांची *एसकेएचएम ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, पुणे* या नामांकित ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्रातील कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. पी. एस. पाटील* व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर *प्रा. स्वप्नील जाधव* यांनी दिली.
एसकेएचएम ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या एच.आर. टीमने घेतलेल्या ॲप्टिट्यूड टेस्ट, तांत्रिक चाचणी व वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान, आत्मविश्वास व संवादकौशल्याच्या जोरावर यश संपादन केले.
*एसकेएचएम ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड* ही ऑटोमोबाईल उद्योगासाठी उच्च दर्जाचे वाहनाचे सुटे भाग तयार करणारी अग्रगण्य कंपनी असून, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन प्रक्रियेसाठी ओळखली जाते. विद्यार्थ्यांना अशा प्रतिष्ठित कंपनीमध्ये करिअरची संधी मिळणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
संस्थेचे संस्थापक *आ. सदाशिवराव भाऊ पाटील*, अध्यक्ष *आ. वैभवदादा पाटील* व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड व्हावी यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे ॲप्टिट्यूड ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, मॉक इंटरव्ह्यू, तांत्रिक प्रशिक्षण तसेच उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदविकेच्या अंतिम वर्षातच रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.
महाविद्यालयातील अद्ययावत प्रयोगशाळा, गुणवत्तापूर्ण अध्यापन, अनुभवी प्राध्यापकवर्ग, नियमित चाचण्या, दत्तक पालक योजना, रात्र अभ्यासिका तसेच उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे आदर्श पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी विविध नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये यशस्वीपणे निवडले जात आहेत. या यशामुळे पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या यशाबद्दल अध्यक्ष *आ. वैभवदादा पाटील*, संस्थेचे कार्यकारी संचालक *मा. पी. टी. पाटील*, वित्त संचालक *मा. रविराज सूर्यवंशी*, संचालिका *मा. पूजा पाटील*, संस्थेचे सर्व संचालक व विश्वस्त, प्राचार्य, सर्व शैक्षणिक अधिष्ठाते, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, संबंधित विभागप्रमुख तसेच सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
