दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत विटा खानापूर रोड लागत विटा जवळ असणाऱ्या सुळेवाडी येथील पवार मळा येथे अनिल चंद्रकांत पवार ( वय वर्षे १९ वर्षी याने अज्ञात कारणाने राहत्या घरात छताचे पंख्या जवळील हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत नारायण सदाशिव पवार वय वर्ष ७० राहणार सुळेवाडी यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली, याबाबत विटा पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की दिनांक रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनिल पवार याने आपल्या घरात आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत फिर्याद दिल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास करीत त्यांनी पंचनामा केला. आत्महत्याची नेमके कारण समजले नाही. तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
