
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात यंदा वरूनराजाची कृपा वेळेत झाल्यामुळे शेतकरी शेतीची कामे वेळेत करताना दिसत आहेत तर काही कामे शेतीची झाली असून सध्या पिकांचे उगवणही चांगली झाल्याचे दिसून येत आहे शिवाय शेतकरी समाधानी आहे त्यामुळे बळीराजा यंदाचा बिंदूर सण मोठ्या थाटात विटा शहरात साजरा होणार हे चित्र दिसून येत आहे. बैल जोडीला सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची दूकाने सजली आहेत,तर मातीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध असल्याने या सुद्धा सर्जा राजाच्या जोडीला खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे, बळीराजाचा सच्चा सोबती म्हणून आजही बैलांना महत्व आहे. यांत्रिक औजारांच्या गर्दीतही बैल जोडी ठळकपणे उठून दिसते. शेतकरी बेंदूर सणाची वाट पाहत असतो. आपल्या सर्जा राजाच्या बैल जोडीला सजवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी विट्याच्या बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण म्हणजे बैलपोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण मराठी सण महाराष्ट्रावर मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी विटा शहरासह ग्रामीण भागातील ४०/४५ वाड्यावरस्त्यावरील शेतकरी वर्गाने शनिवार रविवारपासून सोमवारी येणाऱ्या बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर विट्याला भरलेला आठवडा बाजारात मोठी गर्दी केली होती. बैलांना सजवण्यासाठी लागणारे घुंगरू गळ्यातील चाळपट्टा. वेसण.झुल. वादी, घाटी, सूतकंठा , गोंडा, कासरा, घुंगरू मोरंकी, घुंगरू चाळ, मोरपंखी ,शेंबी. गोंडा कंठा, हे साहित्य खरेदी करताना बळीराजा दिसत आहे. यंदा बळीराजाचे राज्य आल्याने शेतकरी समाधानी आहे. या साहित्याच्या किमतीत यंदा थोडी वाढ झाली असली तरी आपल्या लाडक्या सर्जा राजाच्या जोडीला सजवण्यासाठी बळीराजा पदरमोड करून हे साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे.एकंदरीतच यंदा बेंदरादिवशी बैलांची विटा शहरातून मिरवणूक बघायला मिळणार असल्याने शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, विटा बाजारपेठ या ठिकाणी कुंभार बांधव मंडळींनी सुद्धा विविध आकारातील पीओपी माती पासून बनवलेले आकर्षक रंगातील बैल जोड्या विक्रीसाठी आणल्या होत्या, ५० रुपयांपासून ८०० रुपयापर्यंत विविध रंगातील बैल जोड्या उपलब्ध विक्रीसाठी दिसून येत होत्या. महागाई असली तरीही रूढी परंपरा जोपासत बैलांच्या सणादिवशी पूजन करण्यासाठी मातीच्याच बैल जोड्या खरेदी करण्याकडे कल असल्याचे चित्र दिसून येत होते. बेंदूर सणाला बैलांची पूजा करण्यासाठी तसेच शेतीची पूजा करण्यासाठी आज हे चावार चा वापर केला जातो. डोंगरात मिळणाऱ्या पळसाच्या मुळ्या दगडाच्या सहाय्याने ठेचून जो दोरा सारखा तयार होणाऱ्या भागाला चावर म्हटले जाते.२० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या मुळ्याही विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या होत्या, गोंडा कंठा ला मोठी मागणी; बेंदूर सणाला बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये प्रतिवर्षी भरपूर नवीन नवीन साहित्य येत असते यावर्षी घुंगरू मोरंकी घुंगरू चाळ, मोरपंखी शेंबी. गोंडा कंठा, या नवीन साहित्यांचा समावेश झाला असून गोंडा कंठाला बाजारात शेतकऱ्याकडून मोठी मागणी होत आहे. विटा शहरातील गांधी चौक, आडवी पेठ जैन मंदिर, व विटा नविन भाजी मंडई मध्ये हे सर्व स्टॉल विक्रीसाठी सज्ज झाले आहेत तर काही हार्डवेअर दुकानांमध्ये या साहित्यांची विक्री उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
