दर्पण न्यूज तासगाव प्रतिनिधी -:-
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र होणार, तासगाव तालुका सुधार समिती आता रिंगणात उतरली असून
दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ तासगावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. तासगाव तालुका सुधार समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर युवक नेते संदेशभाऊ भंडारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करत दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी संदेशभाऊ भंडारे केली.
नीट परीक्षा व पेपरफुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात आले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूराचा वापर आणि पाण्याचे फवारे सोडण्यात आले. या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेक शहरांमध्ये निषेध आंदोलने सुरू झाली आहेत
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दीर्घकाळ उपोषण सुरू ठेवले होते. त्यांना जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करण्यात करण्यात आला. विद्यार्थिनींसह अनेक आंदोलनकर्त्यांवर अमानुष पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप आंदोलकांनी केल. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा सुरू असून सरकारने आंदोलन दडपण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तर द्यावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, शिवसेना उभाठा चे नेते व नागाव चे सरपंच पुरण मलमे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जोतिराम जाधव, नगरसेवक अरुण साळुंखे, नगरसेविका उषाताई कांबळे, मनसेचे अमोल काळे, सांगली कारखान्याचे संचालक विशाल चंदूरकर, राहुल माने,प्रमोद सावंत, प्रमोद दरेकर, तासगाव तालुका सुधार समितीचे नजीर मुजावर, रिपाईचे उपाध्यक्ष निलेश गवाळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विक्रांत कांबळे, अनिकेत कांबळे, विजय कांबळे,शिवाजी गुळवे, जितेंद्र कांबळे, प्रवीण मोरे, अझर मुल्ला,शशिकांत डांगे,यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी
लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना शिक्षा करण्यात यावी, तसेच नीट परीक्षा प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
