दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव जिल्हयातील पवनचक्कीचे संबधीत असणाऱ्या प्रकल्पातून तेथील विदयुत वाहीनी तारा चोरीस |जाण्याचे प्रकार घडत होते. अशाच प्रकारचे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व सदरचे गुन्हे | अतिसंवेदनशिल व गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी असे गुन्हे | तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार यांना आदेशित केले होते.
दि २४/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी गोपनीय बातमीदार यांचेकडून प्राप्त माहीतीवरून बोरी पाटी पारधी पिढी ता. वाशी येथून ०२ संशयीत आरोपींना त्यांचे एक महिंद्रा स्कॉपियो व एक | अशोक लेलॅन्ड दोस्त वाहनासाह शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चोकशी केली असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदारांचे सोबत मिळुन आंबेवाडी, बरमगाव, लोहारा, कळदेव निबाळा शिवारात पवनचक्कीच्या | प्रकल्पावरील विदयुत वाहीनी तारा चोरी केली असल्याची कबुल केले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकुण २९९ किलो वजनाच्या विदयुत वाहीनी तारा व गुन्हयात वापरलेली एक महिंद्रा स्कॉपियो व एक अशोक लेलॅन्ड दोस्त वाहन | असा एकुण १६.७० लाख रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला असून आरोपीची वैदयकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईस्तव पोस्टे बेंबळी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव व मा. श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, चापोह रत्नदिप डोंगरे यांचे पथकाने केली आहे.
