दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श संकुलात आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी व रिंगण सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला. ही दिंडी श्री. क्षेत्र रामलिंग बेट बहे, हुबालवाडी येथून प्रस्थान झाली, व आज आदर्श प्रशालेत पोहोचली तेव्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवरावभाऊ पाटील, संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील, संस्थेचे अध्यक्ष वैभव दादा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, संस्थेचे विश्वस्त विशालकाका पाटील,प्रणितीताई पाटील, यांनी या पालखीचे व अश्वाचे पूजन केले. विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी हरिनाम आणि हृदयात भक्ति असलेल्या वारकऱ्यांनी उत्साहाने प्रशालेत आगमन केले.
भक्तिमय वातावरणात या सर्व मान्यवरांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी संपूर्ण आदर्श परिसर टाळ-मृदंगाच्या नादात, भगव्या पताकांच्या डौलात, वारकऱ्यांच्या उत्साहात हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
तसेच आदर्श संकुलातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गायन,नृत्य, लेझीम आणि अभंग सादर केले. आणि रिंगण सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. या विशेषप्रसंगी मा. आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. आणि सर्वांना जणूकाही विठ्ठलाचा आशीर्वादच प्राप्त झाला.
या दिंडी व रिंगण सोहळ्याचे संपूर्ण नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय श्री पी. टी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी आदर्श सी. बी. एस. ई. प्रशालेचे प्राचार्य. श्री अवधूत खरात, उपप्राचार्य निलेश भोसले तसेच पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर,आदर्श स्टेट बोर्ड चे प्राचार्य सुहास तळेकर, तसेच संस्थेचे सर्व शाखाप्रमुख, विश्वस्त सदस्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
