

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी )शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील शिवप्रताप गोल्ड टावर पावर हाऊस रोड लागत बालाजी ऑकाडमीमध्ये ऑकाडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजित दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहर पोलीस मित्र अध्यक्ष श्री शिराज शिकलगार यांनी बालाजी ऑकाडमीचे अध्यक्ष संस्थापक श्री मोरे सर यांच्या उपस्थितीत एरंडे सर.मासाळा सर.व मॅडम सह शिंदे सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी भविष्यात आपले शिक्षण हीच आपल्या भविष्याची वाटचाल, मोबाईल आणि मोटरसायकल पासून कमी वयामध्ये दूर राहा, तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानिकारक या संदर्भात अनमोलाचे मार्गदर्शन केले,या वेळी बालाजी ऑकाडमीमध्ये शिक्षण संदर्भात मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करताना, बालाजी ऑकाडमीमध्ये कायमच प्रत्येक वर्षी रिझल्ट 100% लागला आहे चांगले विद्यार्थी घडले चांगले मार्क विद्यार्थ्यांना गुण मिळाले, सांगली जिल्ह्यामध्ये नाव रूपात असणारी बालाजी ऑकाडमी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांनो आयुष्यामध्ये आई-वडिलांना तसेच आपल्या गुरुजनांना कधीच विसरायचं नसतं, कारण आपले भविष्य घडवणारे हेच गुरुजन आपल्यासाठी महत्त्वाचे असते, अठरा वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्यांना रस्त्यावर वाहन चालवण्यास सहमती दिली जात नाही, कमी वयामध्ये मोबाईल मध्ये कोणत्याही पद्धतीचे पब्जी गेम रिल्स अथवा अन्य चुकीच्या कामासाठी मोबाईलचा वापर करू नका मोबाईल पासून दूर राहिला तरच तुमचे भविष्य घडेल, असे म्हणत पोलीस मित्र पत्रकार शिराज शिकलगार यांनी अनमोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी एरंडे सर मासाळ सर यांनी पोलीस मित्र पत्रकार शिराज शिकलगार यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला, मुलींनी आई-वडिलांना खाली बघावे लागेल असे कधीही वावरू नका, तसेच फेसबुक इंस्टाग्राम चा मोबाईल वर वापर करू नका, अनोळखी व्यक्तीच्या सहभागात अथवा आई-वडिलांच्या माघारी संपर्कात राहू नका, अशा विविध विषयावर अन मोलाचे मार्गदर्शन पत्रकार शिकलगार यांनी बालाजी ऑकाडमीमध्ये केले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण आहोत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आपल्या हाती आहे, अनेक शिक्षण महारथी ज्यांनी शिक्षण विद्या घडवली यांचा आदर्श आपल्यासाठी अनमोलचा असल्याचे सांगत, जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील असे म्हणत भविष्यात कोणीही कायदा हातात घेऊ नका आणि कमी वयात संकटाशी समोर जाऊ नका असे शेवटी सांगितले.