
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-
कोल्हापूर येथील समाजक्रांती सांस्कृतिक चळवळीच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण जीवनगौरव पुरस्कार”आष्टा येथील सुप्रसिद्ध कवी,अभिनेते,डॉ. आनंद हाबळे यांना पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेत्या श्रीमती सरोज एन.पाटील (माई )यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे संपन्न झालेल्या समारंभात दंगलकार नितीन चंदनशिवे, माजी आमदार राजीव आवळे, रिपाईचे उत्तम दादा कांबळे ,प्रा.मेघा पानसरे व डॉ.प्रवीण कोडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
डॉ.आनंद हाबळे यांनी सामाजिक,सांस्कृतिक आणि प्रबोधन पर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन जीवनगौरव पुरस्काराची निवड केली असल्याचे समाजक्रांतीचे अध्यक्ष प्रा.वैभव प्रधान यांनी सांगितले.
डॉ.आनंद हाबळे यांनी गेली चार दशके सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात प्रबोधनात्मक उल्लेखनीय कामगिरी केली आहे व्यसनमुक्ती,दारूबंदी, हुंडाबळी, हागणदारी मुक्त गाव, स्वच्छता अभियान, मतदान अशा अनेक विषयावर जनजागृती प्रबोधन पर व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविले आहेत. विशेषता महिला सक्षमीकरण बचत गटातील महिलांच्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यामध्ये ते सक्रिय सहभाग घेऊन समाजामध्ये जनजागृती करत आहेत त्यांनी महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलन, कवी संमेलन, व्याख्याने यामध्ये निमंत्रित कवी,साहित्यिक म्हणून सहभाग घेतला आहे.
व्यसनमुक्ती वर आधारित अरे संसार संसार एकपात्रीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाज परिवर्तन यासाठी सतत केलेल्या कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे
या सोहळ्यास बाबासाहेब देवकर, बाळासाहेब वाशीकर, गुणवंत नागटिळे, अनिल म्हमाने,अमित कांबळे,वैभव प्रधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.