दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-बालाजी मिटु पायघान, रा. पांगरी ता. बाशी जि. सोलापूर (संशयीत) यांनी दि.12.07.2026 रोजी 17.30 ते दि.13.07.2026 रोजी 06.30 वा. सु. वा. सु. येडशी फॉरेस्ट जवळ कुमाळवाडी शिवार येथे मयत नामे- संतोष उर्फ (दगडु) बाबासाहेब देशमुख, वय 40 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव यांची पत्नी दवैशाली व नमुद आरोपी यांचेत असलेल्या अनैतिक संबधांचे कारणावरुन नमुद आरोपीने कोणत्यातरी धारधार वस्तुने गळा चिरुन जिवे ठार मारले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजित बाबासाहेब देशमुख, वय 35 वर्षे, रा.येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.14.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.