आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जात घट्ट केल्याने माणूस पातळ होईल : साहित्यिक प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे

औंदूबर येथे सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित 82 व्या कवी सुधांशू साहित्य संमेलनात

 

 

 

दर्पण न्यूज औंदूबर ;

साहित्यिकांचा सन्मान करणारे देश जगातील प्रगती पथावरचे देश आहेत. जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होत आहे.जातीचे खोटे आत्मे नष्ट झाले की माणूस मोठा होतो, असे प्रतिपादन साहित्यिक प्राचार्य डॉ सुनीलकुमार  लवटे यांनी केले.

औंदूबर येथे सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित 82 व्या कवी सुधांशू साहित्य संमेलनात ते बोलत होते.

लवटे म्हणाले की औ,दुंबरचे साहित्य संमेलन हे सामान्य माणसांनी सामान्यांसाठी चालविलेली साहित्य चळवळ आहे.कवी सुधांशु, म.भा.भोसले यांनी साहित्यचळवळीला प्रेरणा दिली.महाराष्ट्र जसा सुशिक्षित होत गेला तशी वाचन संस्कृती वाढत गेली.तुकारामांनी जन भाषेत जनकल्याणासाठी अभंग रचना केल्या.साहित्याचे काम सर्व प्रकारच्या अंधश्रध्देचे निर्मूलन करणे हे होय. माणसात माणुसकी असावी त्याच्यामध्ये जात असावी.समाजात काहीतरी बदल घडावा म्हणून लेखक लिहित असतो.

माणसाचं पहिलं नाव हीच त्याची ओळख असते.शेतकऱ्यांनी केवळ मायबाप सरकारवर अवलंबून राहू नये.छोट्या छोट्या अंहकारानी पूर्व जानी केलेलं वारसा मोडत आहोत.जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होत आहे.जातीचे खोटे आत्मे नष्ट झाले की माणूस मोठा होतो.
धर्म हा कर्तव्यानी ठरतो.येथून पुढच्या काळात धर्मांनी नाही तर मूल्यांनी जगायला सुरुवात करावी लागेल.
नदीत स्नान केल्याने मोक्ष मिळतो तर पाण्यातील म्हैस पवित्र का नाही.
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत.आपण परंपरेने निर्माण केलेले भेद नष्ट करून भेदादित भारत निर्माण करणे ही साहित्याची भूमिका आहे.
जीवन तत्व साहित्याची मूलतत्वे ठरली पाहिजेत.
भेदातीत समाज निर्माण होणारी शैक्षणिक धोरण राबविण गरजेचे. जे सर्व बंधनातून मुक्त करते ते शिक्षण,साहित्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य माणसाच्या मनात कोलाहाल निर्माण करणे.
भारतात साहित्यिकांचा हवा तितका सन्मान होत नाही.
साहित्यिकांचा सन्मान करणारे देश जगातील प्रगती पथावरचे देश.त्यांनी खांद्यावर घेतलेली पताका खाली ठेवली नाही.सदानंद साहित्य मंडळाकडून महाराष्ट्र साहित्य संस्कार घेतला.
प्रश्न पडले की साहित्य निर्मिती होती. समाज नि:प्रश्न बनत आहे.
सजग मतदार निर्माण करण हे साहित्याचं आव्हान.साहित्यिकांचा काम समाजाला जाग करण आहे.वैचारिक साहित्य वाचल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, असेही लवटे यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सदानंद सामंत,कवी सुधांशु, म.भा.भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री सोनाली नवांगुळ,सुभाष कवडे,प्रा.संतोष काळे,लेखक विजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा.सौ.भारती पाटील यांच्या अदिम दुःखाचे वर्तुळ या काव्यसांग्रहास २०२४ चा कवी सुधांशु पुरस्कार तर मन्सूर जमादार यांच्या अनुभव तरंग या काव्यसंग्रहास सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वैशाली पाटील यांच्या महाराज सयाजीराव गायकवाड या चरित्र ग्रंथाचे तर प्रा.अशोक बाबर यांच्या संगीत पंचगंगा या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी उद्योजक गिरीश चितळे,डॉ.प्रदीप पाटील,आप्पासाहेब पाटील, अंकलखोपच्या पोलिस पाटील सौ.सुनिता पाटील आदी मान्यवरांसह साहित्यिक रसिक उपस्थित होते.

सौ. नुपूर जोशी,वासुदेव जोशी, वरद जोशी,विभव जोशी यांनी स्वागतगीत सादर केले.शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.सुभाष कवडे यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. ह.रा.जोशी यांनी दिवांगताना श्रद्धांजली वाहिली.वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले.पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!