


दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा पॉलिटेक्निक महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत महाविद्यालयाचा निकाल उंचावला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. विविध विभागांतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
संगणक अभियांत्रिकी विभाग
कु. वैष्णवी किसान दैंगडे – 84.24%, कु. समीक्षा शंकर मोहिते – 85.29% आणि कु. संजना मनोज साळुंखे – 92.53%.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AIML) विभाग
कु. साक्षी अरविंद सिंग – 85.65%, कु. श्रेया शिंदे – 92.33% आणि श्री. पार्थ हणमंत कदम – 92.12%.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (ETC) विभाग
श्री. शिवम हणमंत लाड – 72.94%, श्री. सौरभ मारुती जाधव – 72.00% आणि कु. तस्मिया नजीर मुजावर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग
कु. कस्तुरी विश्वास शेळके – 79.77%, श्री. महेश अप्पासो ऐवळे – 73.77% आणि श्री. मंथन मोहन खंडागळे – 78.89%.
मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग
श्री. आर्यन सतीश पवार – 67.00%, कु. ऋत्विजा निलेश खराडे – 71.89% आणि श्री. ओम विजय निकम – 88.63%.
सिव्हिल अभियांत्रिकी विभाग
कु. श्रद्धा अप्पासाहेब बापकर – 75.22%, श्री. प्रणव शहाजी माने – 82.11% आणि श्री. श्रेयस संदीप भोसले – 91.22%.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अॅड. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांनी विशेष कौतुक करून त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. वैभवदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहे. योग्य मार्गदर्शन व दर्जेदार शिक्षण मिळाल्यास हे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. आदर्श पॉलिटेक्निकचे हे यश त्याचेच उदाहरण आहे.”
संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. पी. टी. पाटील, संचालिका कु. पूजा पाटील आणि आर्थिक संचालक श्री. रविराज सूर्यवंशी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयावर दाखविलेला विश्वास, नियमित अभ्यास आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण अध्यापन, तज्ज्ञ मार्गदर्शन, नियमित चाचण्या आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ होत आहे.”
विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना लेखणी व रोप देऊन यशाचा वेल वाढत राहवो म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. अजितसिंह चव्हाण, डिप्लोमा को-ऑर्डिनेटर प्रा. ए. बी. साळुंखे तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.